Sunday, August 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी…राज्य शासनाच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा पहिला हप्ता...

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी…राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा पहिला हप्ता झाला वितरीत…-२ हजार रुपये खात्यात झाले जमा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा पहिला हप्ता आज दिनांक- २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला आहे. राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा पहिला हप्ता वितरित करून शिर्डी येथून सदर योजनेचा शुभारंभ करण्यात आला.सदर योजनेचा राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.प्रसंगी विविध योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच अन्य नेते उपस्थित होते.केंद्राच्या ‘पीएम किसान योजने’ अंतर्गत ६ हजार रुपये आणि राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबाला मिळणार आहेत.राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी सन २०२३-२४ करिता ६९०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.दरम्यान, आज या योजनेंतर्गत सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना १,७१२ कोटी रूपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पीएम मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

पीएम किसान योजना सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती.त्यापैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले.मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.१५ व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे.

राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपये पहिला हप्ता आज २६ ऑक्टोबर २०२३ रोजी शिर्डी येथील कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर जमा करण्यात आला.यासाठी कृषी विभागाने १७२० कोटी रुपय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!