उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- कामात हलगर्जीपणा केल्यामुळे नंदनवन ठाण्याच्या तपास पथकातील ७ पोलिस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.त्या सर्व वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.बनावट नोटा प्रकरण आणि गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेले अपयश यामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत जमील अहमद यांचा मोहम्मद परवेज सोहेल, सलमान खान समशेर खान पठाण (२७) हसनबाग,आणि आशिष सोहनलाल बिसेन (१८) खरबी चौक यांनी गोळ्या घालून खून केल्याची घटना घडली होती.यामधील आरोपी सलमान खान हा कुख्यात आबू खानचा भाचा आहे. सलमानवर यापूर्वी अनेक दाखल असताना नंदनवन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते.मात्र, पोलिसांनी सलमानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले.तसेच नुकताच एटीएसने परवेज ऊर्फ पप्पू पटेल याच्या घरावर छापा घालून २७.५० लाख रुपये जप्त केले होते.पप्पूसोबतही डीबी पथकाचे अर्थपूर्ण संबंध असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी सात पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करून पोलिस मुख्यालयात करण्यात आली.

