Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीदिल्लीला जाणार गडचिरोली जिल्ह्यातील माती….

दिल्लीला जाणार गडचिरोली जिल्ह्यातील माती….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- देशाच्या जडणघडणीत अनेक महान लोकांनी प्राणाची आहुती दिली.त्यांच्या स्मृति जपण्यासाठी तसेच विविधतेने नटलेल्या या देशाच्या समृद्धतेची साक्ष देणारी अनेक भागातील माती,श्रद्धास्थान असणाऱ्या धार्मिक स्थळांची माती अमृत कलशाच्या माध्यमातून देशाची राजधानी नवी दिल्लीत गोळा केली जात आहे. तेथील अमृत वाटीका बगिच्यात या मातीचा सुगंध दरवळून तो सर्वांना आपलेपणाची भावना देईल,असा विश्वास खा.अशोक नेते यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील धार्मिक स्थळांमधील मातीने भरलेले अमृत कलश बुधवारी गडचिरोलीत एकत्रित करून त्यांचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले होते.’माझी माती, माझा देश’ या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक तालुक्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळावरून गोळा केलेली माती या कलशात गोळा केली होती. सर्वप्रथम शहीद भगतसिंग आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद संकूल शाळा कॉम्प्लेक्स येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याने वाजतगाजत १२ कलश नियोजन भवनात पोहोचविण्यात आले. याप्रसंगी धरती मातेचरणी पंचप्राण शपथ घेतली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!