उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- भारतहा कृषिप्रधान देश आहे.देशातील ७५% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकरी बांधवांना देशाचाच नाही तर जगाचा पोशिंदा म्हटले जाते.अशातच बरेच शेतकरी भाऊ हिष्याच्या कलहामुळे वा इतर घरगुती वादांमुळे बहुतांश शेतकरी शेतजमीनी पडीत ठेवतांना दिसून येत आहेत.मुख्यत्वे शेतकरी बांधवांना नेहमी आर्थिक अडचणींना सामोरेही जावे लागत आहे.यासाठी शासन स्तरावरून शेतकऱ्यांकरीता ठोस पावले उचलून शेतकरी बांधवांच्या शेतजमिनिंची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोफत करून द्यावी; अशी मागणी समाजवादी पार्टीचे देसाईगंज शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्हा पाठोपाठ चंद्रपूर,भंडारा,गोंदिया अशी तीन जिल्हे लागून आहेत.चारही जिल्ह्यातील शेतकरी बांधव ८०% ते ९०% शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.सदर जिल्हे धान उत्पादनास प्रख्यात मानली जातात.शेतकरी बांधवांचा विकास व्हावा; या उद्देशाने शासन स्तरावरून अनेक योजना राबविल्या जातात.मात्र राबविण्यात येणाऱ्या योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसून येतात.शेतकरी वर्ग सततची नापिकी,दुष्काळ,किडीचा प्रादुर्भाव व इतर अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव कर्जबाजारी होऊन टोकाचे पाऊल घेत असतात.यासाठी शासन स्तरावरून ज्याप्रमाणे शेतकरी बांधव यांच्या करीता अनेक योजना राबविल्या जातात; तश्याच प्रकारची योजना अनुसुचित जाती,जमाती व खुल्या प्रवर्गा करीता महसूल विभागाच्या भूमी अभिलेख विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतजमिनिंची मोफत मोजणी करून देण्याची योजना राबविण्यात यावी; असे देसाईगंज समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी मागणी केली आहे.