Wednesday, July 22, 2026
Homeनागपूर'शिवशस्त्र शौर्यगाथा' प्रदर्शनी'; आज शिवरायांची वाघनखे बघता येणार निःशुल्क..

‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनी’; आज शिवरायांची वाघनखे बघता येणार निःशुल्क..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज,बुधवार १९ फेब्रुवारीला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालय परिसरात आयोजित ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनी निःशुल्क राहणार आहे. यावेळी युवकांना लाठी काठी,तलवारबाजी आणि सांस्कृतिक कला प्रदर्शित करण्यासाठीही संधी दिली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढलेली वाघनखे १७ जुलै २०२४ ला विशेष विमानाने लंडनहून मुंबईला आणण्यात आली होती.ही वाघनखे सर्वसामान्यांना पाहता यावीत यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आली होती.
शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या मदतीने स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढला होता.इतिहासातील ही घटना अंगावर शहारा आणणारी आहे.शिवरायांची ही वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडे होती.ही वाघनखे आता राज्य सरकारने महाराष्ट्रात आणली आहेत.वाघनखे मुंबईहून साताऱ्यात आणून  हिंदवी स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयात जनतेला पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती.त्यासाठी एक विशेष दालनही उभारण्यात आले होते.अशातच आता छत्रपती शिवाजी महाराजासह मराठा काळातील गौरवशाली इतिहासाचे प्रदर्शन करणाऱ्या या प्रदर्शनीत शिवाजी महाराजांचे खास हत्यार ‘वाघनखे’ ठेवले आहेत.याच वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता,तसेच येथे अन्य मराठा काळातील हत्यार,प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती आणि त्यात केवळ अडीच इंचाची शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती पाहण्यासारखी आहे. नागपुरात प्रदर्शनी सुरु झाल्यापासून आतापावेतो ७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी ही प्रदर्शनी बघितली आहे.आज बुधवारी शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे आणि सुटीचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येत नागरिक प्रदर्शनी बघायला येण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज, बुधवार २२ जुलै रोजी ५६ वा वाढदिवस संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार...

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!