Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीशाळा,महाविद्यालयात सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश..

शाळा,महाविद्यालयात सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बदलापूरसारखी दुदैवी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये; यासाठी दक्षता घेणे आवश्यक असून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा आणि महाविद्यालयात शासन नियमानुसार तातडीने सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले आहेत.
नियोजन भवन येथे जिल्हा परिषद कामकाजाचा आढावा प्रसंगी ते बोलत होते.जिल्हाधिकारी संजय दैने,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,उपवनसंरक्षक पूनम पाटे,सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
आत्राम यांनी पुढे बोलताना शाळेच्या ५०० मिटर परिसरात पानटपऱ्यांना प्रतिबंध असून याबाबतच्या शासन निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
शाळेतील बालकांचे योग्य पोषण व्हावे म्हणून शासनाने पोषण आहार योजना सुरू केली आहे त्यांचेसाठी मिळालेले धान्य सूव्यवस्थित ठेवण्यात आले आहे का? त्याचा योग्य वापर होतो काय? याबाबत केंद्रप्रमुख आणि शिक्षणाधिकारी यांनी विविध शाळांना नियमित भेटी देऊन तपासणी करण्याचेही मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचा आढावा घेताना सर्व शासकीय रुग्णालयात स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे व त्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.अहेरी उपविभागात पूर परिस्थितीमुळे बंद असलेली बससेवा पुर्ववत सुरू करावी आणि शाळेच्या वेळेनुसारच बस सोडण्याची खबरदारी घ्यावी.गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या मानव विकासच्या ५५ बस मागिल १ वर्षापासून मिळाल्या नाहीत; त्या तातडीने मिळण्याबाबत परिवहन विभागाने पाठपुरावा करावा,  बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्ती कामांची गंभीरपणे दखल घेऊन महत्त्वपूर्ण रस्ते लवकर पूर्ण करावे; आदी सूचना त्यांनी दिल्या.नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा शासनावर विश्वास वाढत असून शासनाकडे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.  अधिकाऱ्यांनी नागरिकांचे कामे तत्पर्तने पूर्ण करून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे आत्राम यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे पैसे त्यांनी काळजीपूर्वक खर्च करावे व गरजेच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी ते बँकेतच जपून ठेवावे.शासनाने सुरू केलेल्या जनकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री आत्राम यांनी केले.
आयुषी सिंह यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा परिषदेच्या विविध कामांची माहिती दिली.जिल्हा परिषद अंतर्गत ५८० पदांसाठी पदभरती सुरू आहे.यातील १० उमेदवारांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आज नियुक्तीपत्र देण्यात आले.
बैठकीला रविंद्र वासेकर,लिलाधर भरडकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके,जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हीवंज,शिक्षणाधिकारी भुसे तसेच जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!