Thursday, May 28, 2026
Homeनागपूरशालार्थ आयडी घोटाळ्यातील पिंजऱ्यात अडकू लागले नवनवीन पोपट .. -आता...

शालार्थ आयडी घोटाळ्यातील पिंजऱ्यात अडकू लागले नवनवीन पोपट .. -आता बोर्डाच्या अध्यक्षाला अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नुकतेच बनावट शालार्थ आयडी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळा प्रकरणी खोलवर रुजलेली पाळेमुळे शोधून काढण्यासाठी एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकाचे गठण करण्यात आले आहे.त्यानुसार पथकाच्या माध्यमातून आता एकेकाची कसून चौकशी करण्यात येत असल्याने घोटाळ्यात नवनवीन पोपट पिंजऱ्यात अडकू लागले आहेत.आता घोटाळ्यात राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय अध्यक्ष तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी याला अटक करण्यात आली आहे.काल रात्रीपर्यंत त्याचे स्टेटमेंट घेण्यात आले.सदरच्या कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी प्रत्यक्ष बोगस शालार्थ आयडी बनविणारा शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक लक्ष्मण उपासराव मंघाम वय ४७ वर्षे,वासंती अपार्टमेंट, आकांशी ले-आउट,दाभा,याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्याच्या चौकशीतून वंजारी याचे नाव समोर आले.वंजारी याचे नाव अगोदरच्या आरोपींच्या चौकशीतदेखील समोर आले होते.२०१९ पासून हा गोरखधंदा सुरू असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे.वंजारी शिक्षणाधिकारी असतांनाच बनावट शालार्थ आयडींना मंजुरी देण्यात आली होती. भरती प्रक्रिया बंद असतांनादेखील ही मंजुरी देण्यात आली व या बाबी संगनमताने लपवून ठेवण्यात आल्या होत्या.सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने वंजारी याला ताब्यात घेतले आहे.त्यामुळे आणखी कोणता नवा पोपट पिंजऱ्यात अडकतोय,याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता फेसबुक,इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या काही फीचर्स वापरासाठी मोजावे लागणार पैसे..

उद्रेक न्युज वृत्त :-आजच्या डिजिटल युगात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप हे अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.वैयक्तिक संवादापासून व्यवसाय,मार्केटिंग आणि मनोरंजनापर्यंत या प्लॅटफॉर्मचा...

शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात पांढर तलाव परिसरातील एका शेतातील विहिरीत वाघाचा बछडा पडल्याची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत...

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!