- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्यात काल,२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली.कुठे राडा झाला तर कुठे शांतमय वातावरणात मतदान झाल्याचे दिसून आले.अशातच नागपुरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील मतदान केंद्रात एका तरुणीकडून आगळा -वेगळा प्रकार कर्मचाऱ्यांना अनुभवायला मिळाला.
विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील ११ सहकारी गृहनिर्माण संस्था अर्थात सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती.सिव्हिल लाइन्स येथील एका केंद्रावर एक युवती मतदानासाठी आली. निवडणूक कर्मचाऱ्यांनी आधार कार्डची तपासणी करून मतदानाची प्रक्रिया सुरू केली.मतदान करण्यापूर्वी डाव्या हाताच्या पहिल्या बोटावर शाई लावली जाते.दुबार मतदान होऊ नये; यासाठी ही पक्की शाई लावली जाते.मात्र,या शाईमुळे माझा नख खराब होईल,असे म्हणत त्या तरुणीने शाई लावण्यास नकार दिला.या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.अखेर तिची समजूत काढत बोटावर शाई लावण्यात आली आणि तिने मतदान केले.
- Advertisement -