Tuesday, August 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशहरांसह ग्रामीण भागात प्रेमप्रकरणांचे जाळे; अल्पवयीन मुलींना फुस लावण्याचे प्रकार वाढीस..

शहरांसह ग्रामीण भागात प्रेमप्रकरणांचे जाळे; अल्पवयीन मुलींना फुस लावण्याचे प्रकार वाढीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शहरांसह ग्रामीण भागात प्रेमप्रकरणांचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले आहेत.अनेक अल्पवयीन मुली घरून पळून जात असून अनेक प्रकरणे बदनामीपोटी दबून असतात.तर काही प्रकरणांत अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यास तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल होतो.भंडारा
जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत ६२ अल्पवयीन मुली हरविल्याची नोंद पोलिसात आहेत.यापैकी ५८ मुली शोधण्यात आल्या तर उर्वरित ४ मुली अद्यापही बेपत्ता आहेत.याच कालावधीत ११ मुले बेपत्ता होती,त्यांना शोधण्यात आले हरविलेल्या ५२० महिलांपैकी ४६३ महिला शोधण्यात आल्या असून ५७ अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित असलेले कायदे केंद्र शासनाने अतिशय कडक केले आहेत.आठव्या ते नवव्या वर्गात असलेल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले जाते.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाते.अल्पवयीन मुलीला पळवून नेणे हा अतिशय गंभीर गुन्हा मानला जातो.अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यास मुलाविरोधात थेट अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक केली जाते.न्यायालय शिक्षा ठोठावत असतो.काही प्रकरणांमध्ये मुलीसोबतच मुलगासुद्धा अल्पवयीन असल्याचे आढळून येते.अशावेळी मुलाला सुधारगृहात पाठविण्यात येत असते.मोठ्या शहरांमध्ये अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर होत असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.गुन्हेगारी करण्यासाठी त्यांचा ब्रेन वॉश केला जाते.त्यांना गुन्हेगारीशी संबंधित प्रशिक्षणसुद्धा दिले जाते.काही मुलींना पळवून नेल्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते.ही अतिशय गंभीर बाब आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!