उद्रेक न्युज वृत्त :-व्हॉट्स ॲप चा वापर जगभरात करोडो लोक करतांना दिसून येतात.व्हॉट्स ॲप सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध मेसेजिंग ॲप आहे.व्हॉट्स ॲप मध्ये नवनवीन फीचर्स व अपडेट्स येत राहतात.अशातच आता व्हॉट्स ॲप चा आधार घेऊन घोटाळेबाज विविध पद्धतीने लोकांची फसवणूक करण्याचा फंडा वापरला जातो आहे.घोटाळेबाज धारकांनी ‘५० रुपये प्रति लाईक्स’ सुरू केला आहे. घोटाळेबाज सुरुवातीला आपल्याला मॅसेज पाठवतात; मॅसेजचा रिप्लाय देताच,घोटाळेबाज कॉल करून YouTube चे व्हिडिओ लाईक्स करण्यासाठी पैसे दिले जातील;असे सांगतात.एवढेच नाही; तर रिप्लाय देणाऱ्यास विश्वास बसावा; यासाठी ते सुरुवातीला काही रक्कम देखील देतात.
यावर,रिप्लाय देणाऱ्यांचा विश्वास जिंकल्यानंतर, ते त्यांना पेमेंट ट्रान्सफरमध्ये काही समस्या येत असल्याचे सांगून,सहजपणे पेमेंट ट्रान्सफर व्हावे यासाठी एक अॅप डाऊनलोड करायला सांगतात. परिणामी या अॅपच्या माध्यमाने ऑनलाईन फसवणूक करणारे आपली सर्व प्रकारची माहिती मिळवतात. यात पासवर्ड्ससह ओटीपी आणि ईमेल सारख्या गोष्टींचाही समावेश आहे.अशा ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांपासून सतर्क राहावे; यासाठी आपल्याला केवळ अशा मेसेजसकडे दुर्लक्ष करणे हाच एकमेव उपाय आहे.