Tuesday, July 21, 2026
Homeनागपूरव्हॉट्सॲपवरील 'एपीके' फाइलने केला घात; दहा लाखाला गंडा..

व्हॉट्सॲपवरील ‘एपीके’ फाइलने केला घात; दहा लाखाला गंडा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका निवृत्त कर्मचाऱ्याला मोबाईल व्हॉट्सॲपवर पाठवलेली बनावट ‘एपीके’ फाइल उघडणे चांगलेच महागात पडले आहे.फाईल उघडताच सायबर चोरट्यांनी मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल दहा लाख रुपये परस्पर वळती केले.नागपूरच्या अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ६५ वर्षीय निवृत्त कर्मचारी यांचे सीताबर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत बचत खाते आहे.नुकतेच १६ जुलैला त्यांच्या व्हॉट्सॲपवर ‘बँक ऑफ महाराष्ट्र पेन्शन कार्ड’ या नावाने एक ‘एपीके’ फाइल पाठवण्यात आली.सदर फाइल बँकेशी निगडित अधिकृत दस्तावेज असल्याचे समजून त्यांनी त्यावर क्लिक केले.फाईल उघडण्यास सुरुवात होताच सायबर चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हॅक केला.त्यानंतर त्यांच्या खात्यातून पहिल्यांदा पाच लाख रुपये,त्यानंतर तीन लाख रुपये आणि नंतर दोन लाख रुपये,असे एकूण दहा लाख रुपये विविध खात्यांमध्ये वळती केले.खात्यातून रक्कम काढल्याचा मॅसेज येताच वृद्धाला धक्का बसला.त्यांनी तात्काळ अजनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.त्यावरून पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
  • नागरिकांना आवाहन👇

अनोळखी व्यक्तींकडून व्हॉट्सॲप,एसएमएस किंवा ई-मेलद्वारे आलेल्या कोणत्याही प्रकारच्या ‘एपीके’ फाइल उघडू नका,अन्यथा आपल्या मेहनतीच्या पैशावर सायबर चोरटे डल्ला मारल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे सतर्क राहा,कुठल्याही अमिषाला बळी पडू नका.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!