Friday, May 1, 2026
Homeमुंबईविरोधी पक्षाच्या आमदारांची मुस्कटदाबी; महाविकास आघाडीच्या आमदारांची राज्यपालांकडे तक्रार..

विरोधी पक्षाच्या आमदारांची मुस्कटदाबी; महाविकास आघाडीच्या आमदारांची राज्यपालांकडे तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे हे सभागृहाच्या कामकाजात पक्षपातीपणा करत असून विरोधी पक्षाच्या आमदारांची मुस्कटदाबी करत आहेत,अशी तक्रार महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज,शुक्रवारी २१ मार्चला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली.आम्हाला न्याय द्या,अशी मागणी विरोधी पक्षांनी  केली.महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शुक्रवारी राजभवन येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषद सभापती सत्ताधारी पक्षाला साथ देऊन नियमबाह्य पद्धतीने कामकाज करतात.विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून,महत्त्वपूर्ण चर्चा करतांना विरोधी पक्षाची अडवणूक केली जात आहे,असे राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे.त्यांची भूमिका ही सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे.आवश्यक तिथे टीका करणे आणि पर्यायी धोरण सुचविणे आहे.विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता सभागृहाचे कामकाज नियमबाह्य पद्धतीने चालविले जात आहे.विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संवैधानिक हक्क डावलला जात आहे,असे यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना कपात सूचना मांडण्याचा अधिकार असतांना त्यांच्या सूचनांना सरकारकडून उत्तर दिले जात नाही.पुरवणी मागणीच्या चर्चेच्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री व राज्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असतांना त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, याकडेही यावेळी राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले. विधान परिषद सभागृहाच्या अदृश्य गॅलरीमध्ये संबंधित खात्याचे सचिवसुद्धा उपस्थित नसतात. संबंधित खात्याचे राज्यमंत्री उपस्थित असतांना खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्याना चर्चेस उत्तर देण्याचा अधिकार दिला जात आहे,अशा प्रकारे विधान परिषदेच्या सभापतींनी सभागृह चालवितांना निष्पक्षतेचा अभाव दाखवला असून,त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे,अशी टीका दानवे यांनी केली.यावेळी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे, विधानसभेतील शिवसेना गटनेते भास्कर जाधव, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना आमदार अनिल परब,अजय चौधरी,सुनील राऊत,सुनील शिंदे, सचिन अहिर,पैलास पाटील,बाळा नर,मनोज जामसुतकर,वरुण सरदेसाई,ज.मो.अभ्यंकर,काँग्रेसचे नाना पटोले,भाई जगताप,प्रवीण स्वामी,अभिजित वंजारी,राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे,जितेंद्र आव्हाड,सिद्धार्थ खरात आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!