उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/ कोरपना ता.प्र.
चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील मौजा-कन्हाळगाव येथील घरात साठवणूक केलेल्या कापसाला विद्युत शार्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची घटना आज १५ एप्रिल ला शनिवारी सकाळी १० वाजता घडली.प्राप्त माहिती नुसार कन्हाळगाव येथील रामचंद्र झोलबा वासेकार यांच्या शेतातील कापूस वेचणी झाल्या नंतर त्यांनी कापूस जुन्या घरामध्ये साठवणूक करून ठेवला होता.
आज दहा वाजताच्या दरम्यान अचानक विद्युत शार्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत जवळपास ५ क्विंटल कापूस,घराचे दरवाजे,कवेलू व टिनाच्या पत्र्याचे नुकसान झाले असून अंदाजे ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.सदर घटनेचा महसूल विभाग व पोलिसांनी पंचनामा केला.पंचनामा करतेवेळी तलाठी कमलवार पोलीस उपनिरीक्षक खेकाडे व गावातील पोलीस पाटील आदी उपस्थित होते.घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.