Saturday, September 12, 2026
Homeनागपूरवांगे तोडतांना काटा रुतल्याचे समजून कामाला लागली; पण अखेर 'तिला' मृत्यूने केले...

वांगे तोडतांना काटा रुतल्याचे समजून कामाला लागली; पण अखेर ‘तिला’ मृत्यूने केले जवळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शेतातील वांगे तोडतांना काटा रुतल्याचे समजून कामाला लागली.पण,काही वेळाने अस्वस्थामुळे घरी परतली.प्रकृती जास्तच खालावल्याने रुग्णालयात हलवले तिथे प्राथमिक उपचारानंतर नागपूरला रेफर करतांना वाटेतच तिला मृत्यूने जवळ केले असल्याची दुर्दैवी घटना नुकतीच दोन दिवसांपूर्वी भिवापूर येथे घडली.४४ वर्षीय रेखा धनराज नंदरधने रा.माळीपुरा, भिवापूर असे सर्प दंशाने मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार,भिवापूर शहरात रेखा या भाजीपाला विक्रीचे काम करत होत्या.लगतच्या रानाई तलाव मार्गावर त्यांचे शेत आहे.यात त्यांनी विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे.त्या नेहमीप्रमाणे शेतात गेल्या.वांगे तोडत असतांना झाडात दडून बसलेल्या विषारी सापाने त्यांच्या हाताच्या बोटाला दंश केला.मात्र,साप नजरेस न आल्याने रेखा यांनी
काटा रुतल्याचा समज करून भाजीपाला वांगे तोडण्याचे काम सुरूच ठेवले.तासाभरानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्या घरी परतल्या.अस्वस्थता वाढल्यामुळे त्यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.तेथील डॉक्टरांनी सर्पदंशाचे निदान केल्याने नागपूरला रेफर करण्यात आले.नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.आता खरिपाचा हंगाम आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!