Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल १ हजार १८३ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर...

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल १ हजार १८३ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लाडकी बहीण योजने अंतर्गत गैरफायदा घेणाऱ्यांची पडताळणी करण्यात आली असून यात तब्बल १ हजार १८३ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी निकषात बसत नसतांनाही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.विशेष म्हणजे,२० पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.महिला व बालकल्याण विभागाने यादीची पडताळणी केल्यानंतर सदरची बाब पुढे आली आहे.१ हजार १८३ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांश अंगणवाडी सेविका यांचाही समावेश आहे.योजनेचा लाभ घेतलेले सर्वाधिक कर्मचारी बुलढाणा जिल्ह्यात १९३,सोलापूर जिल्ह्यात १५०,लातूर जिल्ह्यात १४७,बीड जिल्ह्यात १४५ तर धाराशिव जिल्ह्यात ११० कर्मचारी आढळले.इतर जिल्ह्यात जसे की,जालना जिल्ह्यात ७६,वाशीम जिल्ह्यात ५६,तर पुणे जिल्ह्यात ५४ कर्मचारी आढळलेत.तर काही जिल्ह्यांत,जसे की रत्नागिरी, अकोला आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात केवळ एका कर्मचाऱ्याने गैरफायदा घेतला.गैरप्रकारात बहुतांश कर्मचारी अंगणवाडी सेविका असून ज्यांच्यावर योजनेच्या नोंदणीची जबाबदारी होती.या सेविकांनी स्वतःची नावे यादीत समाविष्ट करून योजनेचा गैरवापर केला.यामुळे नोंदणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत,कारण ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनीच नियमांचे उल्लंघन केले.ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिलेले असून सदरची कारवाई महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार होणार आहे.यामध्ये निलंबन किंवा अन्य शिस्तभंगाच्या कारवाया समाविष्ट असू शकतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!