Monday, August 17, 2026
Homeभंडारारोवणी कामासाठी महिलांना घेऊन जाणारा टेम्पो झाडावर आदळला.. - एक महिला ठार...

रोवणी कामासाठी महिलांना घेऊन जाणारा टेम्पो झाडावर आदळला.. – एक महिला ठार तर आठ महिला गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-सध्या सर्वत्र शेतीच्या रोवण्या सुरू असून काही महिला मजूर रोवणीसाठी बाहेर ठिकाणी जातांना दिसून येतात.अश्यातच आज,शुक्रवार १ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास महिला मजुरांना घेऊन जाणारा छोटा टेम्पो रस्त्यावर अचानकपणे आलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून जोरदार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळला.यात एक महिला मजूर ठार तर आठ गंभीर जखमी झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील मासलमेटा-लाखोरी वळणावर घडली.यात सायत्रा नेवारे वय ४५,रा.किन्ही या मजूर महिलेचा मृत्यू झाला, तर आठ महिला गंभीर जखमी झाल्या असून,त्यांना  भंडारा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करीत लाखनी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना भंडारा येथे हलवण्यात आले.गंभीर जखमींमध्ये छत्रपती बोरकर वय ४० वर्षे, जोत्सना सोनवाणे वय ३५ वर्षे,वंदना सोनवाणे वय ३३ वर्षे,प्रमिला शेंडे वय ४० वर्षे, रत्नमाला बोरकर वय ३४ वर्षे,वैशाली सोनवाणे वय ३७ वर्षे,रामकला नेवारे वय ३१ वर्षे आणि प्रमिला गेडाम वय ४२ वर्षे यांचा समावेश आहे.तर उर्वरित ५ जखमी महिलांवर लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात, तर एका महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!