Thursday, September 3, 2026
Homeमुंबईरोजगार हमीच्या मजुरांसाठी आनंदाची बातमी; थकीत मजुरीसह पुढील कामांसाठी भरीव निधी..

रोजगार हमीच्या मजुरांसाठी आनंदाची बातमी; थकीत मजुरीसह पुढील कामांसाठी भरीव निधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-गेल्या अनेक महिन्यांपासून रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांची मजुरी थकीत असल्याने मजुरांपुढे मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली होती.अश्यातच ‘होळी’च्या सणापूर्वी मजुरांच्या मजुरीचा तसेच रोजगार हमी योजनेतील इतर कामांसाठी निधी मिळावा,अशी मागणी जोर धरत असतांनाच राज्यातील ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देण्यासाठी केंद्र सरकारने ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’ अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी १ हजार १६८ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे.२०२५-२६ या आर्थिक वर्षातील चौथ्या हप्त्याच्या स्वरूपात हे अनुदान प्राप्त झाले असून,यामुळे अकुशल कामे करणाऱ्या थकीत मजुरीचा प्रश्न तर सुटला,त्याचबरोबर पुढील कामे करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आहे.केंद्राकडून प्राप्त झालेल्या या निधीमुळे नवीन कामांना मंजुरी मिळणे सोपे होणार आहे.विशेषतः दुष्काळी आणि दुर्गम भागातील मजुरांना वेळेवर मजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत,यामुळे ग्रामीण रोजगाराला मोठी चालना मिळेल,असा विश्वास व्यक्त केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!