उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यात व इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांसाठी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रे शासनाने सुरू केली आहेत. शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या धानाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जातो.नंतर आधारभूत केंद्रातील धान्याची उचल राइस मिलर्ससह करार करून तांदळाची भरडाई केली जाते.तांदळाची भरडाई तर केली जाते; मात्र नव्याने भरडाई केलेल्या तांदळात काही राईस मिलर्स निकृष्ट दर्जाचे तांदूळ मिश्रित करून वा काही जुना निकृष्ट दर्जाचा तांदूळ कट्ट्यात भरून आपली पोळी शेकण्याचे काम करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेकडून केला जातो आहे.
काही मिलर्स नियमानुसार भरडाई न करता रेशनिंगचा तांदूळ मिश्रित करून लॉट्सच्या रूपात गोदामात शासनजमा करतात.मात्र,हे लॉट्स कसे पास होतात,असा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेकदा आपण रॉशन दुकानात रॉशन आणण्यासाठी गेल्यानंतर खराब असलेल्या तांदळाचे कट्टे वा तांदूळ दिसून येतो.मात्र आम्हाला दोन रुपये वा मोफत रॉशन मिळत असल्याने त्याकडे दूर्लक्ष करून घेतो व तश्याच तांदळाची उचल करून गप्प बसतो.त्यामुळेच आणखी काळाबाजार करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.यासाठी गप्प न बसता यावर आळा घालण्यासाठी आवाज उठविणे गरजेचे आहे.आवाज उठविणे आपला अधिकार आहे.अन्यथा ‘चलती का नाम गाडी,असे झाल्याशिवाय राहणार नाही.