Sunday, May 17, 2026
Homeकुरखेडारिपब्लिकन पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे -रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर - कुरखेडा...

रिपब्लिकन पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे -रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर – कुरखेडा येथे रिपब्लिकन पक्षाची बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-शहराच्या कुरखेडा येथील दादाजी रामटेके भवनात रिपब्लिकन पक्षाची कुरखेडा तालुका बैठक नुकतीच संपन्न झाली असून सदर बैठकीस तालुक्यातील शेकडो पदाधिकारी,कार्यकर्ते तथा मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठक रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षेखाली पार पडली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे,ॲड.सि.एम.जनबंधु, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे,जिल्हा उपाध्यक्ष डोमाजी नंदेश्वर,पिरिपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद सरदारे,जिल्हा सरचिटणीस सुनिल सहारे,रिपाई नेते तथा संस्थापक चरणदास कऱ्हाडे,तालुका महिला अध्यक्षा लता सहारे आदि लाभले होते .
याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्ष व कार्यकर्ते जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. आंबेडकरी चळवळीतील लोकांनी रिपाईच्या बळकटीसाठी सहकार्य करून एकसंघ रिपब्लिकन पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहीजे.अनेकांना रीपाईची शेपूट धरावीच लागेल,त्याशिवाय पर्याय नाही.निवडणुका आल्या की,जो-तो मी मोठा मानून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतो.अश्यांना आपण सर्वांनी मिळून एकजूट संघ तयार करून धडा शिकवणे आवश्यक आहे.त्यामुळे रिपब्लिकन पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे,असे ते बैठकी प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी मारोती भैसारे,ॲड.सि.एम जनबंधु,सुनिल सहारे,लता सहारे आदि मान्यवरांची भाषणे झालीत.
सदर कार्यक्रमाचे संचालन गायक विजय शेन्डे यांनी केले तर आभार प्रमोद सरदारे यांनी मानले.कार्यक्रमास महिला तालुका सचिव विलासिनी राऊत, महिला शहर अध्यक्षा सुरेखा गजभिये,युवा अध्यक्ष मंगेश बन्सोड,अनिल बांबोळे,रोशनी लाळे,अशोक अंबादे, उपाध्यक्ष ताराचंद नंदेश्वर,मोरेश्वर राऊत,डोमाजी नंदेश्वर,दिनेश वालदे,बबिता रामटेके,हंसराज लाडे,दिपक लाडे,अनिल सहारे,दादाजी रामटेके,भिमराव इंदुरकर,नरेंद्र जांभुळकर,यामिनी जनबंधु,छाया जनबंधु,प्रभाताई खोबरागडे,शालीनी राऊत, शामराव लाडे,नरेंद्र जांभुळकर,रमेश जोगे,संध्या तागडे,शालु प्रमोद सरदारे,सरिता लाडे,जयराम ढवळे,बालक भानारकर,शतिश राऊत,जयमाला सहारे, चोखोबा ढवळे,सतिश जनबंधु,नाजुक भैसारे,सतिश टेंभुर्णे,रमा जनबंध,शितल जनबंधु,शालीनी राऊत, संध्या नागरे,आशा राऊत आदि सहीत कुरखेडा तालुक्यातील पिरिपा व रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!