- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी शहरातील ३५ वर्षीय तरुणाच्या छातीत दुखू लागल्याने आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना काल,शनिवारी ३० नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास घडली.नितीन बिसन पाटील,रा.
भवानी वार्ड (फाशी चौक)ब्रम्हपुरी असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी २९ नोव्हेंबरच्या रात्री नितीनच्या पोटात दुखु लागले.पोटात दुखत असतांना त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.काहीकाळ बरे वाटल्याने डॉक्टरांनी त्याला घरी नेण्याचा सल्ला दिला.अशातच घरी आल्यानंतर परत रात्रीच्या सुमारास छातीत दुखु लागले.त्यामुळे त्याला ब्रम्हपुरी शहरातील खिस्तानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले.रात्री उपचारानंतर काल शनिवारच्या
सकाळी नितीनची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी
पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला.मात्र,काही क्षणातच नितीनचा मृत्यू झाला.तरुणाच्या मृत्यूने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -