Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यात अवकाळी पावसाचा इशारा..! -मेघगर्जनेसह,विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस लावणार हजेरी..

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा..! -मेघगर्जनेसह,विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस लावणार हजेरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह,विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त राहील,असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.या अवकाळी पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊ लागले आहे.त्यामुळे थंडीची तीव्रता हळूहळू कमी होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे.सध्या बंगालच्या उपसागरातील दक्षिण-पूर्व आणि मध्य पूर्व भागापासून ते आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कार्यरत असून त्याची तीव्रता कायम आहे.हाच कमी दाबाचा पट्टा आणखी पुढे सरकला आहे.या परिणामामुळे दक्षिण भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागले आहेत.या वाऱ्यांच्या परिणामामुळे उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांवर अटकाव झाला आहे.त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होऊन अवकाळी पाऊस पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!