उद्रेक न्युज वृत्त
कुरूड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे महाशिवरात्री व शिवजयंती दिनाचे औचित्य साधून आज १८ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवचरित्र प्रबोधनाचे कार्यक्रमा प्रित्यर्थ राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे कुरूड नगरीत सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आगमन होणार आहे.नवयुवक मंडळ बळीराजा चौक,सुभाष वार्ड कुरुड यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाप्रसंगी हरी भक्त परायण कुमारी कांचनताई शेळके प्रबोधनकार अमठापुर,जिल्हा- यवतमाळ यांच्या प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले असल्याने; सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.