Tuesday, July 21, 2026
Homeब्रम्हपुरीरेती वाहतुकीवर शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पावित्रा - ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा-रणमोचन येथील घटना...

रेती वाहतुकीवर शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पावित्रा – ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा-रणमोचन येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रम्हपुरी :- तालुक्यातील खरकाडा-रणमोचन येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत मार्गावरून जाणाऱ्या रेतीचे ट्रक,ट्रॅक्टरची अडवणूक केली.तालुक्यातील रणमोचन रेतीघाटाचा लिलाव झाला असल्याने रेतीघाटावरून दररोज ४० ते ५० ट्रक,ट्रॅक्टर रेती भरून रनमोचन गावाकडून खरकाडाकडे जात असतात.शेती वाहतुकीच्या रस्त्यावरून रेतीने भरलेले मोठे ट्रक,ट्रॅक्टर दिवस-रात्र वाहतूक करीत आहेत.वाहनांची धूळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांमधील पिकांवर बसत असल्याने शेतात असलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

सदर नुकसानीबाबत रेती घाट व्यवस्थापनाला वारंवार सूचना देऊनही यावर तोडगा न निघाल्याने शेवटी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.यामुळे रेती भरलेल्या ट्रक,ट्रॅक्टर यांच्या रांगाच-रांगा लागलेल्या होत्या.शेतकरी बांधवांच्या शेतातील होणाऱ्या पिकांचे नुकसान थांबविण्यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी;अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!