Wednesday, August 12, 2026
Homeगडचिरोलीसामूहिक वनहक्क प्राप्त गावांना मिळणार नवसंजीवनी- आता गावातच उपलब्ध होणार रोजगार

सामूहिक वनहक्क प्राप्त गावांना मिळणार नवसंजीवनी- आता गावातच उपलब्ध होणार रोजगार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातील सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्याकरिता शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामपंचायतीतील गावांना समित्या गठीत करण्याचे आदेश दिल्यानंतर; जिल्हा स्तरावरील महिला आर्थिक विकास महामंडळामधे गावातील समित्यातील अध्यक्ष,सचिव व सदस्य यांच्या ७ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असल्याने सामूहिक वनहक्क प्राप्त गावांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

मागील कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील गावांना सामूहिक वनहक्क मिळाले आहेत.परंतु,त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने मिळालेल्या अधिकारापासून वंचित राहावे लागत होते.गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम,आदिवासीबहुल,नक्षलग्रस्त आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी लोक मुख्यत्वे वनावर अवलंबून असल्याने; त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता कायदा मंजूर करण्यात आला आहे.सामूहिक वनहक्क प्राप्त क्षेत्राचे संवर्धन संरक्षण करून त्यातून मिळणाऱ्या शाश्वत वन उत्पादनातून,त्याचप्रमाणे मिळालेल्या मालकी स्वामीत्व हक्कातून जीवनमान उंचवावे, हाच मुख्य हेतू आहे.

सामूहिक वनहक्क प्राप्त गावांतील प्रमुख कामे

सामूहिक वनहक्कप्राप्त गावांचे संरक्षण व व्यवस्थापन आराखडे तयार करणे,संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे, अंमलबजावणी करणे,समितीचे सनियंत्रण करणे,समितीचा आढावा घेणे,ग्रामसभा व सामूहिक व्यवस्थापन समिती सदस्यांना क्षमता वृद्धी प्रशिक्षण देणे,आराखडे तयार करण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती व शासकीय सेवा ग्रामस्तरीय समितीला उपलब्ध करून देणे व इतर सार्वजनिक रोजगार निर्मितीवर भर देणे; अशी प्रमुख कामे यामार्फत केली जाणार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची...

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!