Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यस्तरीय ग्राहक समिती पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न...

राज्यस्तरीय ग्राहक समिती पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-कोल्हापूर येथे राज्यस्तरीय ग्राहक समिती पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.प्रसंगी ग्राहक हक्क जागृतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक पोतनीस हे होते.तर मुख्य अतिथी म्हणून कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा चव्हाण,तसेच करवीरचे नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.मनोहर सरनाईक व प्रसिद्ध उद्योजक मनियार यांच्या हस्ते करण्यात आले.ग्राहक समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड,प्रदेश कार्याध्यक्ष सतीश कुमार बुरगुटे, सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष कोल्हलाळ,युवक अध्यक्ष नाना मोरे,बार्शीचे उपसरपंच जनक कुरुंद,तसेच प्रदेश संघटक सुकुमार पाटील,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मुस्ताक मिस्त्री,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रमेश रेवणकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला अधिक भारदस्त स्वरूप दिलेत.यात महिला आघाडीचा देखील भक्कम सहभाग दिसून आला.महिला प्रदेश कार्याध्यक्ष रोहिणी पराडकर,महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष मेघाताई क्षीरसागर,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दगडू खोत, कोल्हापूर शहराध्यक्ष महिला आघाडी अपर्णा पाटील, तसेच वंदना घाटे यांनी महिला प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमात भाग घेतला.करवीर तालुकाप्रमुख राजू कंटीकर,करवीर भाजप युवा नेते,कणेरी ग्रामपंचायतीचे सदस्य गिरीश बुजरे तसेच आरपीआय युवा नेते प्रदीप ढाले यांची देखील उल्लेखनीय उपस्थिती होती.या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.ग्राहक हक्क रक्षणासाठी झटणाऱ्या या सर्वांचा गौरव करतांना त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली.कार्यक्रमामध्ये ग्राहकांचे प्रश्न,जागरूकता आणि भविष्यातील उपक्रम यावर चर्चासत्रे देखील घेण्यात आली.दीपक पवार यांनी सुंदर शैलीमध्ये सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राहक समितीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.या सोहळ्याने ग्राहक चळवळीला एक नवी दिशा देत संपूर्ण राज्यभरात जनजागृतीचा संदेश दिला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!