Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजयेत्या ७ ऑगस्टला ओबीसी महासंघाचे १० वे राष्ट्रीय अधिवेशन.. -देसाईगंज तालुक्यातील ओबीसी...

येत्या ७ ऑगस्टला ओबीसी महासंघाचे १० वे राष्ट्रीय अधिवेशन.. -देसाईगंज तालुक्यातील ओबीसी समाज बांधव गोव्याला रवाना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-ओबीसी महासंघाचे १० वे राष्ट्रीय अधिवेशन येत्या,गुरुवार ७ ऑगस्ट २०२५ रोजी गोवा येथे होणार आहे.डॉ.शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम,गोवा युनिव्हर्सिटी जवळ,गोवा येथे होणाऱ्या ओबीसी महासंघाच्या दहाव्या अधिवेशनला
आज,सोमवार ४ ऑगस्ट रोजी देसाईगंज ओबीसी समाज संघटनेचे तालुक्यातील पदाधिकारी तथा  कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.
 या प्रसंगी ओबीसी समाज संघटना तालुका देसाईगंजचे अध्यक्ष लोकमान्य बर्डे यांच्या हस्ते  चक्रधर पारधी,राजेंद्र बुल्ले,विलास ठाकरे,ज्ञानेश्वर कवासे,महेश पिलारे,नितीन राऊत गजानन सेलोटे, अरुण कुंभलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंदी दाखवून कार्यकर्त्यांच्या संचाला शुभेच्छा देण्यात आल्या.सदर अधिवेशनात ओबीसी समाजाचे हक्क, अधिकार,राजकीय सहभाग,आरक्षण आणि संघटनात्मक बळकटीकरण या मुद्द्यांवर विचारमंथन होणार असून देसाईगंज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!