Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजयेत्या २ फेब्रुवारीला देसाईगंज येथे भव्य मोफत संपूर्ण रोगनिदान तथा उपचार शिबीरचे...

येत्या २ फेब्रुवारीला देसाईगंज येथे भव्य मोफत संपूर्ण रोगनिदान तथा उपचार शिबीरचे आयोजन.. – नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे )नागरिक आरोग्य रक्षक संस्था,केयर क्लिनिक,अम्मा क्लिनिक,लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंजच्या कमलानगर येथील रफी अहेमद किदवाई मेमोरीयल हायस्कुल याठिकाणी येत्या २ फेब्रुवारीला सकाळी १० ते २ वाजे पर्यंत भव्य रोगनिदान तथा उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात रक्तदाब,ब्लड शुगर, सतत येणारा ताप,किडनीचे आजार,हृदय रोग,अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे,जुनाट हृदय रोग,छातीत दुखणे, धाप लगणे,छातीत धडधड करणे इत्यादी,नेत्र रोग निदाणामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तीरळेपणा,इत्यादी, हायड्रोशील,हर्निया,अंगावरील गाठी,आतड्यांचे आजार मुतखड्याचे आजार,पोटाचे आजार,गलगंड (थायराईड)इत्यादी,स्त्रिरोगांमध्ये मासिक पाळीचे आजार,पांढरे पाणी जाने,महिलांचे इतर आजार, बालरोग यामध्ये हृदयाला छिद्र असणे,मतिमंद, मुलांच्या विकासा संबंधी आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार,अस्थीरोग,संधिवात, मणक्यात असणारी ग्याप,वाकलेले पाय,फ्रॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार,त्वचा रोग खाज,गचकरण, अंगावरील पांढरे डाग,त्वचेचे सर्व रोग,श्वसन रोग,दमा, बरेच दिवसचा खोकला,तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे इत्यादी सर्व रोगांची तज्ञ् डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.सदर शिबिरामध्ये निवड झालेल्या रुग्णांची हेल्प एज इंडिया च्या वतीने मोफत  सश्त्रक्रिया करण्यात येणार असून सदर आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक लतीफ शेख,राजेश गढरिया,नवेद पटेल,योगेश नेवारे,लतीफ रिजवी,मछिंद्र मुळे,अजमत खान सह जावेद शेख यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!