उद्रेक न्युज वृत्त :- भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे,नंदुरबार,जळगाव, नाशिक हलक्या सरी,मेघगर्जना याचा अंदाज आहे.अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे.
दुसरीकडे विदर्भातील अकोला,अमरावती,बुलढाणा, चंद्रपूर,नागपूर,वर्धा येथे रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे.तर भंडारा,गडचिरोली,गोंदिया, वाशिम,यवतमाळ येथेही मेघगर्जनेसह विजा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.