Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'या' राज्यात होणार आगामी पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर..

‘या’ राज्यात होणार आगामी पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ईव्हीएमचा मुद्दा,मत चोरीचा मुद्दा, मतदार याद्यांमध्ये घोळ व इतर नाना तऱ्हेचे आरोप विरोधी पक्षांकडून केले जात असतांनाच कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर(बॅलेट पेपर)घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाला  करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार राज्यातील आगामी पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देतांना कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के.पाटील यांनी ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिलेला नसल्याचे कारण सांगितले होते.मतदार याद्यांमधील विसंगती आणि मत चोरीच्या आरोपांचा उल्लेख करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी सुधारित आणि आवश्यक असल्यास,पुन्हा तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला अधिकार देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.प्रसंगी कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी भाजपला प्रत्युत्तर देतांना म्हटले की,हा कर्नाटक सरकारचा निर्णय आहे,भाजपला काळजी का? सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ शकते.भाजपच्या कार्यकाळात बनवलेल्या कायद्यात एक तरतूद आहे.निवडणुकीत मतपत्रिका किंवा ईव्हीएम वापरले जाऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरण्याचा निर्णय घेतला आहे,तुम्ही का घाबरता? संसदीय निवडणुकांमध्ये काय घडले,याची आम्ही चौकशी केली आहे,मला आता त्यावर चर्चा करायची नाही.असेही ते म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!