- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील
गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय आणि वन विकास महामंडळ(एफडीसीम)अंतर्गत येणाऱ्या शिवरामटोला जवळील कक्ष क्रमांक-३३२ जंगल परिसरात काल, रविवार २३ मार्चला सकाळच्या सुमारास मोहफुल संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलेला पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.अनुसया धानु कोल्हे वय ४५ वर्षे,रा.शिवरामटोला असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे.
हल्ली मोहफुल संकलनाचा हंगाम सुरू झाला आहे.अशातच काल रविवारी सकाळच्या सुमारास
शिवरामटोला येथील काही नागरिक मोहफुल संकलन करण्याकरिता जंगल परिसरात गेले होते.मोहफुल संकलन करीत असतांना दबा धरून बसलेल्या पट्टीदार वाघाने अनुसया कोल्हे हिच्यावर अचानकपणे हल्ला चढवला.वाघाने हल्ला करताच बाजूला असलेले बैल जोरजोराने ओरडू लागल्याने जवळच असलेल्या नागरिकांना काहीतरी घडले असावे असे संकेत आल्याने लगेच आवाजाच्या दिशेने त्यांनी धाव घेतली असता वाघ अनुसया कोल्हे यांना फरफटत नेत असल्याचे दिसले.यावर काही नागरिक परत गावात आले व संपूर्ण माहिती दिली.यावर संपूर्ण गावकरी
घटनास्थळी जमा झाले.वाघाने अनुसया कोल्हे यांना १०० ते १५० मीटरपर्यंत फरकटत नेले आणि वाघ दोन तास मृताजवळ ठाण मांडून बसला असल्याने लोकांना त्या नरभक्षी वाघाला बघता आले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.अनुसया यांचा मृतदेह फरफटत नेल्यानंतर वाघ मृतदेहा जवळच ठाण मांडून बसून होता.याबाबत माहिती मिळताच गोठणगावचे
वनपरिक्षेत्राधिकारी पवार यांनी रेस्क्यू टीमला बोलावून घेतले.रेस्क्यू टीममध्ये एनएनटीआरची टीम,साकोली येथून डॉ.मेघराज तुलावी,हेड कॉन्स्टेबल पराग भुते, आशिष रामटेके,कैलास झोडे,नूतन भंडारकर तर गोंदिया येथील रेस्क्यू टीममध्ये अमोल चौबे,सतीश बेंद्रे,विक्रांत ब्राह्मणकर,शुभम मेश्राम,राकेश ढोक,टिंकू डोंगरवार,दिनेश सोनटक्के,पृथ्वी सयाम यांच्या समावेश होता.टीमला तब्बल चार तासांनी वाघाला जेरबंद करण्यात यश आले.यासाठी हिरवळ बहुउद्देशीय संस्थेचे रुपेश निंबार्ते, छत्रपाल चौधरी व आशिष दुबे यांचेही सहकार्य लाभले.
- Advertisement -