Saturday, April 18, 2026
Homeनागपूरमोठी बातमी अखेर नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपीच्या घरावर चालला बुलडोझर..

मोठी बातमी अखेर नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपीच्या घरावर चालला बुलडोझर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शनिवारी २२ मार्चला नागपुरात पत्रकार परिषद घेत १७ मार्चला
औरंगजेबाच्या कबरीवरुन शहरात झालेल्या  दंगलीबाबत ॲक्शन मोडवर येत दंगलीत झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाईल,दंगेखोरांनी पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल,तसेच दंगेखोरांना सरळ केले नाही तर त्यांना तशी सवय पडेल.त्यामुळे दंगेखोरांना धडा शिकवणे आवश्यक आहे.याप्रकरणी कुणालाही सोडणार नाही,असे फडणवीस म्हणाले होते.अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे.नागपूर घटनेतील आरोपीचे घर आज,सोमवार २४ मार्चला पाडण्यात आले आहे.आरोपी फहीम खान,शमीम खानच्या नागपूर शहरातील संजयबाग कॉलनीतील घरात त्याने अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले होते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने त्याला नोटीस बजावली होती.यानंतर अनधिकृत बांधकाम बुलडोझरने आज सोमवारी पाडण्यात आले.फहीम खानविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो कोठडीत आहे. फहीम खानबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असतांना त्याच्या घरात बांधकाम अनधिकृत असल्याची बाब समोर आली.त्यामुळे त्याच्या दुमजली घराबाबत महानगरपालिकेने त्याला तात्काळ नोटीस बजावली.२४ तासांच्या आत नागरी मुदतीत कथित बेकायदेशीर बांधकाम हटवले नाही तर बुलडोझरने कारवाई केली जाणार,अशी नोटीस देण्यात आली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याने परवानगी दिली तर बुलडोझर चालवले जातील असे वक्तव्य केल्यानंतर दोन दिवसांनी सदरची कारवाई करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!