Saturday, October 24, 2026
Homeभंडारामोहफुल वेचत असतांनाच वाघाचा हल्ला; एकजण ठार..

मोहफुल वेचत असतांनाच वाघाचा हल्ला; एकजण ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच वाघाने एका नागरिकास यमसदनी धाडल्याची घटना घडल्याने नागरिकांनी घटनेप्रती तीव्र संताप व्यक्त केला आहे. मोहफुल वेचण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या एका ५० वर्षीय इसमावर वाघाने अचानकपणे हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज,गुरुवार १९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उमरझरी-बाम्पेवाडा जंगल परिसरात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.वसंत गणपत मेश्राम वय ५० वर्षे, रा.बाम्पेवाडा,ता.साकोली,जि.भंडारा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.सध्या ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणी मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू आहे.सकाळच्या सुमारास मोहफुल वेचने व गोळा केलेली मोहफुले वाळवून काही कालावधीनंतर त्यांची विक्री करून दोन पैसे उदरनिर्वाहासाठी लावणे,अशी हंगामी रोजीरोटी ग्रामीण भागातील नागरिक करीत असतात.अश्याच प्रकारे वसंत मेश्राम हे आज गुरुवारी सकाळच्या सुमारास शेतालगत असलेल्या मोहाच्या झाडाची मोहफुले वेचण्यासाठी गेले होते.शेत जंगल परिसराला लागूनच असल्याने मोहफुल वेचत असतांनाच अचानकपणे वाघाने वसंत मेश्राम यांच्यावर हल्ला चढवला आणि ठार केले.इकडे घरची मंडळी वसंत मेश्राम यांची घरी परतण्याची वाट पाहत होते. सकाळपासून मोहफुले वेचण्यासाठी गेलेले वसंत मेश्राम हे घरी न परतल्याने कुटूंबीय तसेच ग्रामस्थांनी शेत शिवारात तसेच जंगल परिसरात शोधाशोध केली असता काही अंतरावरच त्यांचा मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी व पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून पुढील तपासाची कारवाई करण्यात आली.घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!