- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ रोजी घेण्यात आली होती.
परीक्षा संपल्याने विद्यार्थी तथा पालकांना परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा होती.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पुढील मे महिन्याच्या १३ तारखेला लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती व याबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत राज्याचे शिक्षणमंत्री करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.अशातच आता बारावीच्या निकालाबाबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबद्दलची माहिती दिली आहे.त्यानुसार उद्या सोमवार ५ मे रोजी दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार असून पत्रकार परिषदेत संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल,विभागनिहाय निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी एक वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे.तर मंगळवार ६ मे पासून महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.
उद्याला ‘या’ ठिकाणी पाहू शकता निकाल👇
- Advertisement -

