Wednesday, August 26, 2026
Homeमुंबईमोठी बातमी.. अखेर माणिकराव कोकाटे कृषी मंत्री पदावरून बाहेर.. - अधिवेशनात ऑनलाईन...

मोठी बातमी.. अखेर माणिकराव कोकाटे कृषी मंत्री पदावरून बाहेर.. – अधिवेशनात ऑनलाईन रमी गेम खेळणे भोवले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-विधानसभेत रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यात आले असून कृषिखात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे.तर भरणे यांच्याकडील आधी असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे.राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असतांना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत होते.त्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी पोस्ट केला होता.त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा,यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव टाकला होता.परंतु कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आला आहे.माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषिमंत्री होते. परंतु,विधिमंडळ कामकाजात मोबाइलवर रमी खेळतांनाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता.त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर कोकाटे यांनी आपण रमी खेळत नसल्याचे सांगितले होते.आता त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्री पद देण्यात आले असून माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!