- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांच्या मुलीमध्ये राजकीय वैर असल्याचे चित्र दाखवणे म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे.अहेरी विधानसभा क्षेत्राची सत्ता आपल्याच घराण्याकडेच राहावी,यासाठी धर्मरावबाबा,भाग्यश्री आत्राम आणि अंब्रीशराव आत्राम यांची धडपड सुरु आहे.हे लोक खोकेबाज आणि धोकेबाजही आहेत, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करीत आत्राम परिवारावर घणाघात केला.ते काल,२९ सप्टेंबरला रविवारी अहेरी येथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात बोलत होते.
वडेट्टीवार पुढे म्हणाले,अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात धर्मरावबाबा आत्राम यांनी मुलगी भाग्यश्री आत्राम आणि जावयाला नदीत बुडविण्याची भाषा केली.त्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करुन धर्मरावबाबांना खुले आव्हान दिले.हाच धागा पकडून वडेट्टीवार म्हणाले की, ‘तू मारल्यासारखे करतो,तू रडल्यासारखे करतो,असा हा प्रकार आहे.
लोकसभा निवडणुकीत एका काका,पुतण्या आणि मुलगी सर्वच एका बाजूला असताना काँग्रेसला अहेरी विधानसभा क्षेत्रात १२ हजारांचे मताधिक्य मिळाले. मागील ४० वर्षांपासून अहेरीची सत्ता राजघराण्याच्या ताब्यात असतानाही या क्षेत्राचा विकास झाला नाही. रस्त्याची अवस्था बकाल आहे.रुग्णवाहिका नाही म्हणून रुग्णाला खाटेवर झोपवून आणावं लागतं, दवाखान्यात डॉक्टर आहे,तर परिचारिका नाही.कुठे औषध आहे,तर रुग्णवाहिका नाही.याला कुणी विकास म्हणत असतील तो पाहायची काँग्रेसची इच्छा आहे,असेही वडेट्टीवार म्हणाले.अहेरी क्षेत्राचा विकास करण्यासाठी आम्ही ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी हायकमांडला विनंती करु.नाही मिळाली तर मैत्रीपूर्ण लढत देऊ,असेही त्यांनी जाहीर केले.
- Advertisement -

