Wednesday, September 2, 2026
Homeमुंबईमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस गडचिरोली विकासासाठी समर्पित.. -राष्ट्रपती,पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा..

मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस गडचिरोली विकासासाठी समर्पित.. -राष्ट्रपती,पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मंगळवार २२ जुलै रोजी आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली विकासासाठी समर्पित केला. वाढदिवसदिनी विविध विकास कामांचे उदघाटन,भूमिपूजन केले.वृक्षारोपणाच्या मोहीमेचा शुभारंभही केला.दरम्यान,आज दिवसभरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा देणार्‍यांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यपाल,अनेक केंद्रीय मंत्री,ज्येष्ठ नेते शरद पवार,माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार,प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे तसेच इतरही अनेक मान्यवरांचा समावेश होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात ४.५ एमटीपीए स्टील प्लांटच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावली.हा विदर्भातील पहिलाच प्रकल्प असून, यातून २४ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे,तर १० हजार रोजगार निर्माण होणार आहेत.हेडरी ते कोनसरी या दोघांना जोडणारी महाराष्ट्रातील पहिल्या आणि विक्रमी वेळात पूर्ण झालेल्या स्लरी पाईपलाईनचे त्यांनी उदघाटन केले.यामुळे कार्बन उत्सर्जनात ५५ टक्के घट होणार आहे.हेडरी येथील आयर्न ओर आणि ग्राईंडिंग युनिटचे त्यांनी उदघाटन केले.हे महाराष्ट्रातील पहिले युनिट आणि पोलाद क्षेत्रात नवे मापदंड स्थापन करणारे आहे.कोनसरी येथे पॅलेट प्लांटचे उदघाटन केले.हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकाच रचनेतील भारतातील सर्वांत मोठा प्रकल्प असून शाश्वत पोलाद निर्मितीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.कोनसरीत १०० खाटांच्या रुग्णालयाचे,आधुनिक सीबीएसई शाळेचे तसेच सोनमपल्ली येथे लॉईडसच्या टाऊनशीपचे त्यांनी भूमिपूजन केले.दुपारी ‘हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र’ या मोहीमेतही भाग घेतला.नवीन वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीत त्यांनी जवानांसोबत साजरा केला होता,आज या भल्या मोठ्या विकास कामांतून एकप्रकारे गडचिरोलीच्या विकासाचा टिळा मुख्यमंत्र्यांना वाढदिवशी लागला.मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत आज राज्यभरात आरोग्याचेही अनेक उपक्रम हाती घेण्यात आले होते.रक्तदान शिबीर,आरोग्य तपासणी शिबिर, आभा कार्ड वाटप,अवयव दानाचा प्रचार,कृत्रिम अवयव वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.अनेक मान्यवरांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीत सुद्धा योगदान दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!