Saturday, June 27, 2026
Homeनागपूरमी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले आहे. खासदारांनंतर शिंदे गटाने मोर्चा आता आमदारांकडे वळवल्याची चर्चा सुरू झाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत यावे, आम्ही त्यांचे स्वागतच करू,असे म्हटल्याने विविध चर्चांना उधाण आले.यामुळे अनेकांनी विजय वडेट्टीवार हे शिवसेनेत जाण्याच्या बाता झोडल्या होत्या.त्यावर, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळवून लावले आहे.वडेट्टीवार यांनी म्हटले की,मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.पक्षाच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम आहे.पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; त्यामुळे   बदनामीचे राजकारण थांबवा.राज्यात शेतकरी, बेरोजगारी,महागाई,कायदा-सुव्यवस्था,महिला सुरक्षा, पायाभूत सुविधा अशा अनेक गंभीर प्रश्नांनी जनता त्रस्त आहे.या विषयांवर सरकारने उत्तर द्यावे,अशी अपेक्षा असतांना काही मंडळी मुद्दामून अफवा पसरवून आणि व्यक्तिगत बदनामी करून मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत.याविषयी त्यांनी
समाजमाध्यमातून भूमिका व्यक्त केली.निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे.जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे.महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला.त्यामुळे काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचे काम करतात.शिंदे गटात जाणार का? पक्ष प्रवेश करणार का? कोणाला भेटले का? अशा प्रकारच्या निराधार बातम्या पेरल्या जातात.काही पत्रकारही कोणताही तथ्य नसता प्रश्न विचारून मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रत करतात.ही पत्रकारिता नसून खोडसाळपणा आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे; असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!