Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजमाजी महिला व बालकल्याण सभापती रोषणीताई पारधी यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने...

माजी महिला व बालकल्याण सभापती रोषणीताई पारधी यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने शरबतचे वाटप…-कोंढाळा येथे आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आज डॉ.बाबा साहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून कोंढाळा गावातील भारतीय जनता पक्षाच्या माजी महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गडचिरोली रोषणीताई पारधी व सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन उन्हा-तान्हात डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या बौद्ध उपासक,उपासिका,महिला मंडळ तसेच लहानांपासून तर थोरांपर्यंतच्या आंबेकरी अनुयायांसाठी गावातील ग्रामपंचायत नजिक शरबतचे वाटप करण्यात आले आहे.

बी.आर.आंबेडकर यांनी केवळ दलीत,शोषित तसेच वंचितांचाच उद्धार केला नसून ते सर्वांसाठी झटले.आज त्यांची १३३ वी जयंती केवळ भारत देशात साजरी होत नसून अनेक देशांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा तसेच सिद्धांतांचा उलगडा करून सर्वत्र जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.तशाच प्रकारची जयंती मोठ्या उत्साहात कोंढाळा येथे बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली आहे.आज दिनांक-१४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.राहुल बौद्ध विहारापासून ते संपूर्ण गावामध्ये डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने आनंदाच्या वातावरणात डीजेच्या तालावर तसेच समता सैनिक दल यांच्या रेप-राईट व शिस्तबध्द पद्धतीने कार्यक्रम शांततेत पार पडला.अशातच माजी महिला व बालकल्याण सभापती रोषणीताई पारधी यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने शरबतचे वाटप करून एक अनोखा आदर्श निर्माण करण्यात आला असल्याने त्यांचे व सहकाऱ्यांचे सर्वत्र प्रशंसा व कौतुक करण्यात येत आहे.

प्रसंगी रोशनीताई पारधी,प्रशांत भाऊ मंडपे,कांतीलाल शेंडे,प्रफुल मेश्राम, भागवत मेश्राम,प्रशिक मेश्राम,प्रकाश बेदरे,एकनाथ राऊत,नाना मेश्राम,नाना दिघोरे,नंदिनी वाढई,ताराबाई ढोरे,शारदा दिघोरे,सचिन कुंभरे इत्यादींनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!