उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/ कोरपना ता.प्र.
चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात माजी आमदार ॲड.संजय धोटे यांच्या वाढदिवसा निमित्त मौजा-मांगलहीरा येथे २८ फेब्रुवारी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर,ग्रामीण रुग्णालय कोरपना,प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोग दिन निदान व नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. शिबीरामध्ये नेत्र तपासणी पात्र रुग्णांना नेत्र शास्त्रक्रियेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर याठिकाणी ५ एप्रिला पाठवण्यात आले होते.सर्व रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून काल ८ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे रुग्ण परत आले.
आदिवासी भागात गेल्या पाच वर्षापासून ॲड.संजय धोटे माजी आमदार यांचा वाढदिवस हा ‘मानव सेवा हिच ईश्वर सेवा’ समजून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा मिळावी; दुष्टीकोन नजरेसमोर ठेवून अनिल कवरासे कोरपना व ज्योतीराम कोहचडे मांगलहीरा व सहकारी आरोग्य शिबीराचे लाभ थिपा हनुमान गुडा, उमरहिरा,शिवापूर,रुपापेठ,खडखी,दुर्गाडी पार्डी गावातील जणतेला होत आहे.