- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-रात्रीच्या सुमारास महिलेच्या घरात शिरून तिचा हात पकडून छेड काढणाऱ्या ग्रामसेवकाला नागरिकांनी सामुहिक चोप दिल्याची घटना तालुक्यातील नवरगावकला येथे सोमवारी दिनांक-१९ ऑगस्ट रोजी घडली.याप्रकरणाची अद्यापही पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही.मात्र,या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून; परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासन संपात सहभागी असताना,ग्रामसेवकाने सोमवारी १९ ऑगस्टला सायंकाळी गावातील एका महिलेच्या घरात जाऊन, त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला.अश्यात महिलेने आरडाओरड केल्याने तिच्या घरातील मंडळी धावून आली.प्रकार उघडकीस येताच गावातील नागरिकांनी ग्रामसेवकाला भर चौकात चांगलाच चोप दिला असल्याचे बोलले जात आहे.अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडविले.या प्रकाराला घेऊन मध्यरात्री पर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात राडा होत राहिल्याची गुप्त महिती प्राप्त झाली.परंतु या प्रकरणाची अद्यापही तक्रार झाली नसल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. सदर घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून,प्रशासनाची मान खाली घालणाऱ्या ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी कोणती कारवाही करतात? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
केवल कांबळे,तंटा मुक्त समिती अध्यक्ष, नवरगावकला👇
गावात घडलेला प्रकार सत्य असून,सदर प्रकारामुळे गावाच्या इभ्रतीला धक्का पोहोचला आहे.त्यामुळे सदर व्यक्तीवर कारवाही होणे अपेक्षित आहे.
- Advertisement -

