नवी दिल्ली :-देशातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेद्वारे,प्रत्येक राज्यातील ५० हजार महिलांना मोफत शिलाई मशिन दिली जाईल जेणेकरुन त्या घरी बसून शिवणकाम करू शकतील आणि स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील.मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी महिलांना नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन अर्ज भरू शकता.ऑनलाईन अर्ज करण्याचे अधिकृत संकेतस्थळ pmvishvakarma.gov.in हे आहे.
महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना… – राज्यातील ५० हजार महिलांना मिळणार मोफत शिलाई मशिन…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
योजनेंतर्गत २० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जात आहे.अनेक महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने त्यांना घराबाहेर पडून काम करणे कठीण झाले आहे.अशा महिलांसाठी सरकार मोफत शिलाई मशिन उपलब्ध करून देत आहे; जेणेकरून त्या घरी बसून शिलाई मशीन वापरून स्वतःची कामे करू शकतील आणि कुटुंबाला हातभार लावू शकतील.या योजनेंतर्गत सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन तर देत आहेच,शिवाय त्यांना शिवणकामाचे प्रशिक्षणही देत आहे.हे प्रशिक्षण अगदी मोफत आणि जवळच्या प्रशिक्षण केंद्रावर उपलब्ध आहे.यासाठी महिलांना फक्त नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा लागेल.
शिलाई मशीन योजनेंतर्गत देशातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले जात आहे.शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा समान लाभ घेता येईल.योजनेचा लाभ मिळाल्यानंतर महिला घरबसल्या शिलाई मशीन वापरून उत्पन्न मिळवू शकतात.जेव्हा महिला कमावू लागतील तेव्हा त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि समाजातील त्यांची भूमिका सुधारेल.नोकरी करू इच्छिणाऱ्या परंतु रोजगाराचे कोणतेही साधन नसलेल्या अशा महिलांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या योजनेमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महिलांच्या जीवनात खूप महत्त्वाची सुधारणा होणार आहे.
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES