Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजमहात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा..

महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-संविधान दिनाचे औचित्य साधून आज,बुधवार २६ नोव्हेंबरला देसाईगंज शहराच्या नैनपुर वॉर्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण,दीप प्रज्वलन व विधिवत पूजन करून करण्यात आली.प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिन कां साजरा केला जातो,भारतीय संविधान तयार होण्याची प्रक्रिया,ते केव्हा स्वीकारले गेले आणि केव्हा लागू झाले,याबद्दल सविस्तर व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.या माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, कुतूहल आणि जागरूकता निर्माण झाली.त्यानंतर
विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी संविधान,बाबासाहेब आंबेडकर,लोकशाही आणि नागरिकांच्या हक्कांवर मनोगत मांडले.यानंतर वर्ग १ आणि वर्ग २ मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला.निळा,पांढरा,केशरी आणि हिरवा या रंगांनी संविधानातील एकता व विविधतेचा संदेश अगदी सुंदरपणे मुलांनी व्यक्त केला.या विशेष दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी जादूचे खेळ-प्रयोग दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांचा आनंद,टाळ्यांचा गजर आणि त्यांची चमकणारी उत्सुकता पाहून वातावरण अधिक रंगतदार झाले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी समन्वयाने काम केले.यात उपस्थित शिक्षक ईश्वर गहाणे,मंगेश तूपट,शिक्षिका तृषाली सुखदेवे,अपर्णा जडे,प्रियंका तलमले,प्राची इत्यादी सर्व शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन करून संविधानाबाबत मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचे समर्पित कार्य केले.संविधान दिन उत्साहात, शिस्तीत आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.शाळेच्या प्रगतीत आणि विद्यार्थ्यांच्या संस्कारात असा प्रत्येक दिवस महत्वाची भर घालणारा असतो,असे मनोगत मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी यावेळी व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!