Monday, October 26, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक यांचेकडून नगरपरिषद निवडणूक व्यवस्थेची पाहणी..

गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक यांचेकडून नगरपरिषद निवडणूक व्यवस्थेची पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी आज,बुधवार २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी मतदान यंत्र सुरक्षा कक्षाला(स्ट्राँग रुम)आणि ईव्हीएम साठवणूक कक्षाला भेट देऊन तेथील सुरक्षा यंत्रणा आणि व्यवस्थेचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला.या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्वप्रथम कृषी महाविद्यालय येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाला (स्ट्राँग रुम)भेट दिली.त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्ट्राँग रुममध्ये आवश्यक असलेल्या सर्व व्यवस्था,विशेषत: सीसीटीव्ही(CCTV)यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा तसेच डबल-लॉक सिस्टीम योग्य प्रकारे कार्यान्वित आहे की नाही,याची तपासणी केली. त्यासोबत त्यांनी परिसरातील बाह्य सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ईव्हीएम साठवणूक कक्षालाही भेट दिली.येथे त्यांनी सुरक्षा अलार्म,अग्निशामक यंत्रणा आणि पुरेसा विद्युत पुरवठा (दिवे) याची खात्री केली. याव्यतिरिक्त,मतमोजणीच्या दिवशी या परिसरात होणारी गर्दी प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठीच्या नियोजनावर त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे समवेत अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक गोकुल,गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

कार चालकाचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कार चालकाचे स्टेअरिंगवरून अचानकपणे नियंत्रण सुटल्याने कार थेट तिसऱ्या लेनमधील अज्ञात वाहनाला मागून धडकून झालेल्या...

आज गॅस एजन्सी धारकांचा संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील एलपीजी वितरक(गॅस एजन्सीधारक)कमिशनवाढ व इतर विविध मागण्यांसाठी आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत.एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!