- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नोंदणी अधिनियम स्पष्ट असून गडबड करणाऱ्या मुद्रांक अधिकाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याची सरकारची भूमिका आहे.पुण्यातील जमीन गैव्यवहारप्रकरणी गडबड आढळल्यानंतर प्राथमिक कारवाई झाली असून अंतिम निर्णय चौकशी अहवालानुसार होणार आहे.महसूल आणि नोंदणी खात्यात काही गडबड वाटल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करावी,सरकार ऐकायला तयार आहे.कर्जमाफी संदर्भात शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाहीत, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.मदतनिधीपैकी ९ हजार कोटींपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांना वितरित झाल्याचे सांगत पुढील काही दिवसांत निधी जलदगतीने वितरित होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना स्पष्ट केले. प्रसंगी बावनकुळे यांनी पोलिस भरतीपासून जमीन व्यवहार,कर्जमाफी,निवडणूक युती आणि शेतकरी मदतनिधीपर्यंत अनेक विषयांवर स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडली.पोलिस भरतीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या मागण्या डीजींकडे पाठवल्याचे सांगत लवकरच मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहे.पुणे जमीन व्यवहार प्रकरणी समितीची चौकशी सुरू असून महिनाभरात अहवाल सादर होणार आहे; दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई नक्कीच केली जाईल,असे ते म्हणाले.
- Advertisement -

