- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-भूकंप इतका भयानक असतो की,त्याची कल्पना आपण करूच शकणार नाही.मोठ- मोठी इमारत आपण जमीनदस्त होतांना बघितले आहे.जमिनीचे कंपन भयावह असते.तत्पूर्वी भूकंपापूर्वी,भूकंपादरम्यान व भूकंपानंतर काय कराल याची माहिती जाणून घेऊया…
भूकंपापूर्वी👇
भूकंप का होतो,याची कारणे व होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करा आणि त्याची तज्ञ व्यक्तींबरोबर चर्चा करा.इमारतीचे बांधकाम भूकंप प्रतिरोधक करण्याची दक्षता घ्यावी.तुमच्या हाताला सहज येईल अशा रितीने बॅटरी टॉर्च बॅटरीवर चालणारा रेडिओ आपल्याजवळ ठेवा.घरात हालचालींसाठी मोकळी जागा ठेवा.व्हरांड्यात पसारा ठेवू नका.इमारतीच्या भिंतीना तडे गेले असतील तर ते बुजवणे व भिंतीची मजबूती करणे या गोष्टी आवश्यक आहेत.अवजड आणि मोठ्या वस्तू शक्यतो जमिनीलगत ठेवा.उंच भिंतीची ठेवू नका.वीज पुरवठा दोष पूर्ण असल्यास शॉर्टसर्किट होण्याचा धोका संभवतो,म्हणून घरातील वीजपुरवठा यंत्रणा शक्यतो दोषरहित ठेवा.घरामध्ये सतत प्रथमोपचार पेटी तयार ठेवा.उंच,जुन्या आणि सलग असणाऱ्या इमारतीपासून दूर रहा.भिंती,वीजेच्या तारांपासून आणि ज्यांची अंगावर पडण्याची भीती असेल अशा वस्तूंपासून लांब रहा.
भूकंपादरम्यान काय कराल ?
स्वतः शांत रहा व दुसऱ्यास शांत राहण्यास सांगा. घाबरु नका,शांत रहा व सावधानतेने बाहेर पडा.कच्ची इमारत असल्यास बाहेर पडा.आपल्या घरातील तुळईखाली/चौकटीखाली उभे राहुन,टेबला पलंगाखाली / जिन्याखाली जाऊन बसा.शक्यतो मजबूत टेबलाखाली बसा,बाहेर पडतांना शक्य झाल्यास चादर,उशी किंवा रिकामे पोते अथवा कपड्याची घडी डोक्यावर घ्या म्हणजे डोक्याला मार बसणार नाही.उंच इमारत/माडीवर असाल तर शक्यतो खाली मोकळ्या जागी या.रस्त्यावर थांबा, इमारतीचा आश्रय घेऊ नका.पटकन मोकळ्या जागेत या.घाई गडबड,दंगा करु नका.रस्त्याच्या कडेने पळू नका.
भूकंपानंतर काय कराल ?
शक्यतो शांत रहा,रेडिओवरून मिळणाऱ्या सूचना काळजीपूर्वक ऐका.यानंतरही भूकंप होऊ शकतो असे गृहित धरा.त्याचप्रमाणे सावध रहा.पाणी,वीज, गॅस कनेक्शन सुरु असल्यास बंद ठेवा.धुम्रपान करु नका. काही ओढू नका अथवा वीज बटन लगेच चालू करु नका.भूकंपकाळात गॅस गळती किंवा शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते,म्हणून भूकंप झाल्यास वीजपेक्षा बॅटरीचा उपयोग करा.विद्युत पुरवठा खंडित झालेल्या विजेच्या तारांना अथवा तुटलेल्या तारांना हात लावू नका अथवा अशा एखाद्या धातूच्या वस्तूला हात लावण्याचे टाळा.
- Advertisement -