Friday, September 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूचा मृत्यू; कारचे बोनेट आणि इंजिनच्या भागाचा अक्षरशः चुराडा..

भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूचा मृत्यू; कारचे बोनेट आणि इंजिनच्या भागाचा अक्षरशः चुराडा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूचा मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पुण्याहून गुजरातच्या दिशेने जात असतांना मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या मनोरजवळील दुर्वेस गावाजवळ घडली. यात आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी शिवाजी पाटील वय २७ वर्षे,रा.पारिजात नगर, सिडको कॉलनी,छत्रपती संभाजीनगर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा सहकारी यश प्रशांत चौधरी वय २२ वर्षे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
संभाजी पाटील हे आज सोमवारी पुण्याहून खासगी कारने अहमदाबादमध्ये प्रशिक्षणासाठी जात होते. दरम्यान,त्यांची फॉर्च्यूनर कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावात पोहचली.त्यानंतर महामार्गावर जातांना डाव्या बाजूला एक ट्रक उभा होता. भरधाव असलेली कार उभ्या ट्रकला जाऊन जोरदार धडकली.या भीषण अपघातात कारचे बोनेट आणि इंजिनच्या भागाचा अक्षरशः चुराडा होऊन अपघातस्थळी केवळ कारचा मागील भाग आणि चाकेच शिल्लक राहिली.झालेल्या अपघातात संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.संभाजी पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील पारिजात नगर सिडको कॉलनीत वास्तव्यास होते.ते उच्चशिक्षित आणि अत्यंत कर्तबगार अधिकारी म्हणून परिचित होते.बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते.त्यांनी नेमबाजीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग आणि मनोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात नेले.पण,नेमबाजपटू संभाजी पाटील यांना मृत घोषित करण्यात आले,तर गंभीर जखमी प्रणयवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.पाटील यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले असून उद्याला त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!