Tuesday, June 30, 2026
Homeदेसाईगंजभव्य प्रवेशोत्सवातून शिक्षणाचा नवा अध्याय.. - महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा...

भव्य प्रवेशोत्सवातून शिक्षणाचा नवा अध्याय.. – महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड देसाईगंज येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आयएसओ मानांकन प्राप्त महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर वार्ड,देसाईगंज येथे आज,मंगळवार ३० जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवसानिमित्त प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांच्या आकर्षक प्रभात फेरी व मिरवणुकीने झाली.गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक,पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नवागत विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.संपूर्ण गावात शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शाळेत आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,पाठ्यपुस्तके, लपुष्पगुच्छ आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या नाजूक पावलांचे ठसे घेऊन वर्गखोली सुशोभित करण्यात आली.या अभिनव उपक्रमामुळे शाळेने पालकांसह उपस्थितांचे मन जिंकले.यानंतर आयोजित पालक सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित राहिले.पालकांनी विविध प्रश्न,सूचना आणि अपेक्षा मांडल्या.त्यावर मुख्याध्यापक खेमराज तिघरे तसेच नगरपरिषद आरोग्य सभापती चैतन्यदास विधाते यांनी सविस्तर मार्गदर्शन करून प्रत्येक प्रश्नाचे समर्पक निरसन केले.अस्मिता पचारे,विनोद नखाते, चांदेवार,बगमारे,कुथे आदी पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे देण्यात आली.त्यामुळे पालकांनी शाळेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास शासनामार्फत विशेष शिक्षक अमोल पडोळे यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच नगरपरिषद आरोग्य सभापती चैतन्यदास विधाते, प्रतिष्ठित नागरिक अण्णाजी तुपट,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे,संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालक यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मंगेश तुपट यांनी केले,तर आभार प्रदर्शन ईश्वर गहाणे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या आकर्षक रथाची सजावट तृषाली सुखदेवे,अपर्णा जडे आणि प्राची खरकाटे यांनी केली.प्रियंका तलमले व भारती राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले.शाळेतील सर्व शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले.
यावेळी कवासे यांनी गावोगावी जाऊन शाळेच्या गुणवत्तापूर्ण कार्याची माहिती पोहोचविणे,पालकांशी सातत्याने संवाद साधणे आणि शाळेविषयी सकारात्मक जनजागृती निर्माण करण्यासाठी केलेले परिश्रम विशेष कौतुकास पात्र ठरले.त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाला.
“गुणवत्तापूर्ण शिक्षण,संस्कार,आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास” या ध्येयाने वाटचाल करणारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वार्ड ही आज परिसरातील पालकांची पहिली पसंती ठरत असून,प्रवेशोत्सवाच्या या भव्य यशस्वी आयोजनाने शाळेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची आणि सामाजिक बांधिलकीची प्रभावी साक्ष दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.. – ‘शिक्षण ही दररोजची तपस्या’-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या पुढाकारातून...

आज उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्याची शेवटची तारीख; उद्यापासून हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त :-जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट(एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत आज,मंगळवार ३० जून रोजी संपत असून,त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार...

साहित्यिक व कलावंतांना दरमहा ५ हजार मानधन; ऑनलाइन अर्जासह ऑफलाइन प्रस्ताव सादर करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना' अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या...

उद्यापासून ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांची होणार पडताळणी; बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात "मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६" प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!