- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट(एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत आज,मंगळवार ३० जून रोजी संपत असून,त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.त्यामुळे उद्या,बुधवार १ जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर राज्यभरात दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अद्याप बरीचशी वाहने एचएसआरपीविना असल्याने अश्या वाहनधारकांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे.
राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.या निर्णयासाठी परिवहन विभागाने तब्बल सहा वेळा मुदतवाढ दिली.मात्र,आता कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.वाहनांवर एचएसआरपी नसल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.विशेष म्हणजे, ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार नाही.मात्र,ज्यांनी अद्याप स्लॉटही बुक केलेला नाही,त्यांना तपासणीदरम्यान दंडाला सामोरे जावे लागू शकते.नोंदणीसाठी अधिकृत एचएसआरपी संकेतस्थळ किंवा आरटीओच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.वाहनाचा नोंदणी क्रमांक,इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक भरा.उपलब्ध तारखांमधून सोयीचा स्लॉट निवडून ऑनलाइन शुल्क भरा आणि निश्चित दिवशी केंद्रावर जाऊन एचएसआरपी बसवून घ्या.
- Advertisement -

