उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी :- स्वतः च्या राहत्या घरी विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी ५ सप्टेंबर २०२३ रोजी उघडकीस आली.प्रतीककुमार ऊर्फ चिंटू यशवंत बांबोळे ३२ वर्षे रा.महालक्ष्मीनगर कुर्झा वॉर्ड असे मृताचे नाव आहे.प्रतीक कुमार हा विवाहित युवक शहरातील कुर्झा वॉर्ड येथे आई व आपल्या तीन वर्षांच्या मुलासह राहत होता.त्याची पत्नी सोबत राहत नव्हती.त्याने पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.पोलिसांना पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.त्याच्या पश्चात ३ वर्षांचा मुलगा,आई व बहीण असा परिवार आहे.