Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीबांधकामाचा अनुभव,शिक्षण नसतांना लाखो रुपये खर्च करून शासकीय निधी सपाट करण्याचा घाट..

बांधकामाचा अनुभव,शिक्षण नसतांना लाखो रुपये खर्च करून शासकीय निधी सपाट करण्याचा घाट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासकीय योजनेच्या १५ लाखापर्यंत मंजूर निधीतील नाली बांधकाम,सिमेंट रस्ते,सभागृह,वर्ग खोल्या यासारखी कामे ग्रामपंचायत यंत्रणेला लावून करायची मुभा शासनाकडून प्राप्त झाली आहे.मात्र,या कामावर कुठल्याही बांधकामाचा अनुभव वा शिक्षण नसतांनाही ग्रामपंचायत पदाधिकारी,राजकिय पक्षाचे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.ही कामे करतांना इस्टीमेटचा (अंदाजपत्रक) आधार न घेता अतिशय निकृष्ट व अनियमित कामे होत असल्याने अल्पावधीत ही विकास कामे मोडकडीस आल्याचे दिसून येत आहे.
या कामांवर लाखो रुपये खर्च करून एक प्रकारे शासकीय निधी सपाट करण्याचा घाटच सुरु आहे. त्यामुळे ही कामे करणारे कार्यकर्ते,ठेकेदार,सबंधित अधिकारी,अभियंते आर्थिकतेने गब्बर झाल्याचे दिसत आहे.या निकृष्ट बांधकामाची ग्रामस्थांकडून तक्रार वा चौकशीची मागणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली तर त्याची योग्य चौकशी व कुठलीही कारवाई न होता त्याकडे मुद्दाम डोळेझाक होत असल्याचा प्रकार होत आहे.
देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची,एटापल्ली, भामरागड,सीरोंचा,अहेरी,चामोर्शी,गडचिरोली,धानोरा,मुलचेरा तालुक्यात ग्रामपंचायत,नगरपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,आमदार,खासदार,रोजगार हमी योजना वा इतर योजनेतून मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत.सबंधित बांधकामे निकृष्ट व अयोग्य साहित्यांचा वापर यातून ठेकेदार व सबंधीत अधिकारी,अभियंते यांच्यात आर्थिक लालसेपोटी साठगाठ असल्याने मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे.शासकिय निधी अर्धेच खर्च करून बाकी निधी सपाट करण्याचे काम होत असल्याचे निदर्शनात येत आहेत.शासकीय निधीचा अपव्यय थांबविण्यासह दोषी ठेकेदार व अभियंते यांच्यावर दंडात्मक तथा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी...

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!